येऊ कसा मी तुमच्या दर्शनाला ।
शिर्डीच्या साईनाथा ।
धाव सत्वरी आता ।
येऊ कसा मी तुमच्या दर्शनाला ॥ १ ॥
दोन्हीही पाय गेले, अपंगत्व आले ।
अपंग नव्हतो, तेव्हा दुर्दैव आड आले ।
पूर्वजन्माचा भोग भोगतो, इलाज नाही त्याला ।
येऊ कसा मी तुमच्या दर्शनाला ॥ २ ॥
दुख में सुमिरन सब करें ।
सुख में करे न कोय ।
जो सुख में सुमिरन करे ।
तो दुख काहे को होय ॥ ३ ॥
(संत कबीर का यह दोहा कितना सार्थक है !)
आता वयाची नव्वदी उलटली ।
शारीरिक दुःख किती सांगू तुम्हाला ।
जगण्याची आशा न उरली ।
तुमचा हा दास सुधा ।
येऊ कसा मी तुमच्या दर्शनाला ॥ ४ ॥
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |