(म्हणे) ‘आताच्या व्यवस्थेला घाबरून गप्प राहिलो, तर ते उद्या आपल्या घरापर्यंत पोचू शकतात !’
हुसेन दलवाई यांचे फुकाचे बोल
माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ सभेचे आयोजन
गेली ७० वर्षे व्यवस्था दलवाई यांच्या काँग्रेसच्याच हातात होती, हे ते विसरले आहेत का ?
पुणे, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – आताच्या व्यवस्थेला घाबरून गप्प राहिलो, तर समोरच्या घरातील कुणीतरी मारला जातो, ते उद्या आपल्या घरापर्यंत पोचू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे, असे फुकाचे बोल हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. (हत्यांचे लोण आपल्या घरात येण्याची चिंता करणारे दलवाई काश्मीर येथे हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना, इस्लामी आतंकवादामुळे शेकडोंनी बळी गेलेले असतांना कधी असे बोलले नाहीत. आता सत्ता हातातून गेल्यानंतर व्यवस्थेला घाबरण्याची वक्तव्ये करणार्यांनी गेली ७० वर्षे त्याच व्यवस्थेच्या माध्यमातून हिंदूंना घाबरून गप्प रहाण्यास भाग पाडले, हे जनता ओळखून आहे ! – संपादक) २८ फेब्रुवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ अभिवादन सभेत ते बोलत होते. या अभिवादन सभेमध्ये तिस्टा सेटलवाड, अधिवक्ता सुनील दिघे, हुसेन दलवाई, डॉ. बी.ए. इनामदार, कॉम्रेड विश्वास उटगी हेही ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी झाले होते.
या वेळी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील म्हणाले की, सध्या चालू असणारे शेतकर्यांचे आंदोलन हे केवळ शेतकर्यांचे नसून जो अन्न खातो, त्या सर्वांचे असल्याने या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा, तरच देश वाचेल अन्यथा देश संपेल, असे आवाहन मी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी लोकांना केले होते.