राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला मराठी भाषा शिकवावी !
ब्रिटनच्या राजदूतांची ट्वीटद्वारे मागणी
ब्रिटनच्या राजदूतांनी केलेली मागणी महाराष्ट्राला अभिमानास्पद ! मराठीजनांनी यातून शिकावे !
मुंबई – ब्रिटनचे भारतातील राजदूत अॅलन जेमेल यांनी ‘राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला मराठी शिकवावी’, असे ट्वीट केले आहे.
मैं आजकल हिंदी सीख रहा हूँ, लेकिन मैं उम्मीद करता हूँ कि इस अवसर पर @AUThackeray मुझे थोड़ी-बहुत मराठी सिखाएँ !
सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy #MarathiLanguageDay !
— Alan Gemmell (@alangemmell) February 27, 2021
त्यात त्यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, ‘‘सध्या मी हिंदी भाषा शिकत आहे. यानिमित्ताने मला आदित्य ठाकरे यांनी मराठीही शिकवावी. सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ’’, असे त्यांनी म्हटले आहे.