रस्त्यात सापडलेले दीड लाख रुपये परत करणारे सिंधुदुर्ग येथील प्रमोद हडकर !
मालवण – तालुक्यातील वायरी, भूतनाथ येथे एका पर्यटन व्यावसायिकाचे रस्त्यात सापडलेले तब्बल दीड लाख रुपये येथील प्रमोद सावळाराम हडकर यांनी त्या व्यावसायिकाला परत केले. घरची परिस्थिती बेताची असलेल्या हडकर यांच्या या प्रमाणिकपणाविषयी त्यांचे गावात कौतुक केले जात आहे. (माणूस आर्थिक परिस्थितीमुळे चोर, हप्तेवाला गुंड, भ्रष्टाचारी किंवा अप्रामाणिक बनत नाही, तर वाईट संस्कारांमुळे बनतो, हेही यातून सिद्ध होते ! त्यामुळेच शालेय शिक्षणापासून चांगले संस्कार होण्यासाठी साधना शिकवणे आवश्यक ! – संपादक)