हरिद्वार कुंभमेळ्याला येणार्यांना नोंदणी करणे अनिवार्य
डेहराडून (उत्तराखंड) – राज्य सरकारने हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये येणार्या प्रत्येकासाठी नोंदणीकरण अनिवार्य केले आहे. यासाठी संकेतस्थळवर नोंदणी करता येणार आहे. तसेच कोरोनाची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) असल्याचा अहवालही सादर करावा लागणार आहे.
Haridwar: Kumbh preparations underway, registration, #Covid19 report mandatoryhttps://t.co/yfQrk3r8HT pic.twitter.com/384djlwnDe
— Mint (@livemint) February 19, 2021
यानंतरच संबंधितांना कुंभमेळ्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने ही काळजी घेतली आहे.