इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री सायकलवरून विधानभवनात जाणार !
मुंबई, २८ फेब्रुवारी – इंधनाचे दर वाढल्याच्या निषेधार्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१ मार्च या दिवशी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि सर्व आमदार सकाळी १० वाजता मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवन येथे जाणार आहेत.