बनावट नोटा सिद्ध करणार्या धर्मांधाला ८ वर्षे सश्रम कारावास आणि ५० सहस्र रुपये दंड
संभाजीनगर – बनावट नोटा सिद्ध करणारा आरोपी माजित खान बिस्मिल्ला खान याला सत्र न्यायाधीश एस्.एम. भोसले यांनी विविध प्रकारच्या ३ कलमान्वये ८ वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ५० सहस्र रुपये दंड सुनावला आहे. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी अधिवक्ता सतीश मुंडे वाडकर यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने १९ मे २०१७ या दिवशी आरोपीच्या न्यू बायजीपुरा येथील घरी धाड टाकली होती. या धाडीमध्ये स्कॅनर, प्रिंटर, तर २ सहस्र रुपयांच्या २१३ बनावट नोटा, ५०० रुपयांच्या १५२ बनावट नोटा आणि १०० रुपयांच्या ९३ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या आरोपींच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.