नागरिकांना लुटणार्या उत्तरप्रदेश येथील पसार धर्मांधास ठाणे येथे अटक
लोकसंख्येत अल्पसंख्यांक असणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
ठाणे, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – उत्तरप्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यात एका व्यक्तीची गाडी अडवून तिच्याकडील १२ लाख २० सहस्र रुपये असलेली बॅग चोरून असवद तालीब शेख (वय ३३ वर्षे) हा पसार झाला होता. त्याला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी ५० सहस्र रुपये रोख असे पारितोषिक घोषित केले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी येथील हरिनिवास भागात आला असता ठाणे पोलीस आणि लखनौ पोलीस यांनी सापळा रचून संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत शेख याला अटक करण्यात आली. त्याला पुढील अन्वेषणासाठी लखनौ पोलिसांच्या कह्यात दिले आहे.