मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित ! – अधिष्ठाता डॉ. दीक्षित
सांगली – सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मिरज आणि आसपासच्या नागरिकांनी अन्य उपचारांसाठी सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी केले आहे.