कुटुंबाची अपकीर्ती थांबवा अन्यथा आत्महत्या करीन ! – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पूजाच्या वडिलांची प्रतिक्रिया
बीड – ‘या सर्व प्रकरणात माझ्या कुटुंबाची अपकीर्ती होत आहे. ती लवकर थांबायला हवी, अन्यथा आत्महत्या करीन’, अशी चेतावणी पूजा चव्हाणच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. ‘या प्रकरणी प्रतिदिन नवीन छायाचित्र आणि ‘ऑडिओ क्लीप’ समोर येत आहेत. त्यामुळे कुटुंबाची अपकीर्ती होत आहे’, असे पूजाच्या वडिलांनी सांगितले.