बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हा नोंद
मुंबई – भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना वर्ष २०१६ मध्ये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. किशोर वाघ यांच्या विविध शहरांत असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याविषयी म्हणाले, ‘‘आम्ही चित्रा वाघ यांच्या समवेत आहोत. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानेच राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे.’’
‘‘महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्याने आणि मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’’
– चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप |