मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याने ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत ! – खासदार संजय राऊत
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत. राज्यात कोण काय बोलत आहे ? याकडे त्यांचे लक्ष आहे. ते जागरूक मुख्यमंत्री आहेत. त्यांचे प्रत्येक घडामोडीकडे लक्ष आहे. कोणत्याही गोष्टीचे अन्वेषण पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतरच बोला. मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत. ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. त्याला संजय राऊत यांनी वरील शब्दांत प्रत्युत्तर दिले.