देवद आश्रमातील स्वागतकक्षाच्या परिसरातील बागेत नैसर्गिकरित्या आपोआप आलेल्या पपईच्या झाडांना घातक विषाणू असलेली फळे लागणे
‘देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील स्वागतकक्षाच्या परिसरातील बागेत नदीच्या बाजूला पपईची झाडे आपोआप उगवली आहेत. त्या झाडांना भरपूर फळे लागली आहेत. त्यांतील ५ पपया पिकल्याने १७.११.२०१८ या दिवशी त्या प्रथमच काढल्या. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्या पपयांविषयी कृषी विद्यापिठातील एका प्राध्यापकांनी एका शासकीय अहवालाचा संदर्भ देऊन सांगितले,‘सांडपाण्याच्या सहवासात जे झाड वाढते, त्या झाडात आणि त्याच्या फळांमध्ये शरिराला घातक विषाणू निर्माण होतात. त्यामुळे ती फळे खाण्यास अयोग्य असतात.’
नंतर रामनाथी आश्रमात त्या पपयांचे ‘पिप’ या प्रणालीद्वारे परीक्षण केले असता ‘ही फळे त्रासदायक शक्तीने बाधित असून त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आहे’, असे लक्षात आले.’
– (पू.) सौ. अश्विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०१८)