मशिदीमध्ये अजान देण्यास अनुमती नाकारणार्या इमामाचा सहकार्याकडून शिरच्छेद !
स्वतःच्या धर्मबांधवाचा शिरच्छेद करणारे धर्मांध हे हिंदूंविषयी कधीतरी सहनशीलता दाखवतील का ?
रामजूपर (उत्तरप्रदेश) – येथील नागलिया आकिल मशिदीमध्ये अजान देणार्या ६२ वर्षीय इमाम सागीर बेग यांचा मशिदीमध्येच शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. या वेळी इमामाला वाचवण्यासाठी आलेल्या अन्य दोघांवरही आक्रमण करण्यात आले. यानंतर आरोपी जलीस अहमद तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. जलीस पूर्वी मशिदीमध्ये अजान देत होता. नंतर सागीर बेग काही दिवस ती देऊ लागले; मात्र नंतर जलीस याला त्यांनी अजान देण्यास अनुमती नाकारल्याने त्यावरून ही हत्या करण्यात आली.