केरळमध्ये हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ची झाली स्थापना !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – ‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी वसंतपंचमीला म्हणजेच १६ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने हिंदुत्वासाठी कार्य करणार्या संस्थेची गुरुकृपेने स्थापना केली. इलांगविल भगवती मंदिरातील सभागृहामध्ये डॉ. मिनी नंबुदिरी यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संन्यासी महासभेचे राज्य सचिव श्रीमद् शंकरकृष्णानंद सरस्वती स्वामी यांचे मुख्य प्रवचन होते. ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’च्या लोगोचे प्रकाशन तिरुवितांकूर राणी श्रीमती अश्वती तिरूनाल गौरी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ज्ञान-वैराग्याची शिदोरी संपूर्ण जगभरात पोचवण्यास अन्नपूर्णा फाऊंडेशनला श्री पद्मनाभस्वामी यांचा आशीर्वाद लाभो, हीच प्रार्थना !’’
१. ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून हिंदूंना धर्म आणि अध्यात्म यांविषयीचे शिक्षण देण्यासाठी ‘सनातन धर्मपीठम्’, गरीब हिंदूंना अन्न देण्यासाठी ‘अन्नपूर्णा केंद्र’, योग अन् नैसर्गिक चिकित्सा यांचे संगोपन करण्यासाठी ‘योगदा’, हिंदू युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देणे आणि हिंदु धर्मावर होत असलेल्या आक्रमणांविरुद्ध न्यायालयीन लढा देण्यास इच्छुक अधिवक्त्यांंसाठी ‘सनातन अधिवक्ता परिषदे’च्या (‘कौन्सिल’च्या) माध्यमातून कार्य करणे, असे कार्य करण्याचा श्री. बिनिल सोमसुंदरम् यांचा विचार आहे.
२. कार्यक्रमाच्या वेळी डॉ. मिनी नंबुदिरी म्हणाल्या, ‘‘अन्नपूर्णा फाऊंडेशन सर्व जगभरातील हिंदूंसाठी सामूहिक आणि आध्यात्मिक केंद्र होऊ दे.
३. आशीर्वाद स्वरूपातील प्रवचन देताना श्रीमद् शंकरकृष्णानंद सरस्वती स्वामी म्हणाले, ‘‘जगभरात अन्नपूर्णा फाऊंडेशनचे केंद्र यांची स्थापना गुरुपरंपरेच्या कृपेने होऊ दे.’
४. फाऊंडेशनच्या स्थापनेच्या दिवशी रिजनल कॅन्सर सेंटर, थिरूवनंतपूरम् येथील रुग्ण आणि इतर लोकांना अन्नदान करण्यात आले. तसेच अन्नपूर्णा फाऊंडेशनची पहिली शाखा प्रारंभ झाली.