गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद
सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – खंडाळा गावाच्या सीमेत ३ जणांनी बैलांची हत्या करून मांस टेम्पोत भरले. तसेच विनाअनुमती अवैधरित्या मांसाची वाहतूक केली. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात या ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता या घटनेतून दिसून येते ! – संपादक)
याविषयी पोलिसांनी सांगितले की, २३ फेब्रुवारी या दिवशी पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा गावाच्या सीमेत महंमद खान, शफिक बेपारी आणि महंमद रंगरेज या तिघांनी अवैधरित्या बैलांची हत्या केली आणि त्यांचे मांस टेम्पोत भरून वडगाव ते मुंबई विनाअनुमती वाहतूक करणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निखिल खंडागळे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.