‘गुरुदेवांनी मातृभाषेचे पेरलेले बीज आता रोपाच्या माध्यमातून दिसू लागणे’, याविषयीचे एक उदाहरण !

‘एका ग्राहकांनी ‘ऑनलाईन’ ग्रंथ मागवतांना त्यांचा पत्ता हिंदी भाषेत लिहिला होता. त्यांनी लिहिलेले गावाचे नाव मी ‘गूगल’वर शोधले; पण ‘ते कुठल्या जिल्ह्यातील आहे’, हे कळत नव्हते. तेव्हा ‘पार्सल पाठवले, तर परत येऊ नये’; म्हणून मी त्यांना संपर्क करून पुन्हा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी पुन्हा गावाचे नाव तेच सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘असे गावाचे नाव ‘गूगल’वर दिसत नाही.’’ ‘गूगल’वर जे नाव दिसते, ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले ‘‘हो. योग्य आहे. तेच गावाचे नाव आहे; मात्र ते इंग्रजी भाषेत आहे.’’

नंतर ते म्हणाले, ‘‘सनातनमध्ये सांगितले आहे ना की, स्वभाषेत बोलायला हवे. इंग्रजी भाषेत नको; म्हणून मी तसे लिहिले. कुठून तरी आरंभ झाला पाहिजे; म्हणून मी सध्या अधिकाधिक हिंदी भाषेत बोलतो आणि लिहितो. मी इंग्रजी भाषेचा वापर न्यूनतम करतो.’’

त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझी गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुदेवांनी मातृभाषेचे पेरलेले बीज आता रोपाच्या माध्यमाने बाहेर दिसत आहे. मला याविषयी पुष्कळ आनंद झाला.’

– कु. शशिकला आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक