गांजा लागवड प्रकरणी अटकेत असलेल्या परदेशी आरोपींचा कारागृहात धिंगाणा
सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – वाई येथील विष्णू श्री बंगल्यात गच्चीवर गांजाची शेती करणार्या २ जर्मन आरोपींना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते; मात्र त्यांनी जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घालत तेथील कर्मचार्यांना मारहाण केली. तसेच कारागृहातील सी.सी.टी.व्ही. छायाचित्रक फोडले आणि शौचालयाचा दरवाजा तोडून टाकला. (गुन्हेगार कारागृहात मोडतोड करतात म्हणजे त्यांना पोलिसांचा धाक नाही का ? तसेच पोलीसही त्यांच्याकडून मार खातात म्हणजे त्यांना प्रशिक्षण नाही का ? – संपादक)