सातारा पोलिसांची जुगाराच्या अड्ड्यावर धाड; ५० जणांना अटक
१० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन
सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे.
साहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २ लाख ३ सहस्र २२० रुपये रोख, ८ लाख ३५ सहस्र ९५० रुपये मूल्याच्या २ चारचाकी आणि ६ दुचाकी अन् भ्रमणभाष शासनाधीन करण्यात आले. जुगार खेळणार्या ५० जणांना अटकसुद्धा करण्यात आली. सातारा शहरातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे मानण्यात येत आहे.