साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे वर्धा येथील श्री. विजय डगवार (वय ६५ वर्षे) !
१. सातत्य
‘श्री. विजय यांचे व्यायाम करणे, स्तोत्र म्हणणे, आढावा देणे, यांत सातत्य असते.
२. लहान मुले आणि प्राणी यांच्याप्रती प्रेमभाव असणे
त्यांच्यातील प्रेमभावामुळे शेजारची लहान मुले त्यांच्याशी बोलायला येतात आणि त्यांच्याकडे फुले मागतात. ते मुलांशी प्रेमाने वागतात. ते मुलांना चॉकलेट देतात. मुले ‘आप्पा’ असे म्हणून त्यांची आठवण काढतात. ते गाय, कुत्रा, खारूताई, तसेच पक्षी यांना खाण्यासाठी पोळीचे लहान तुकडे करून ठेवतात.
३. इतरांचा विचार करणे
त्यांना चहा, न्याहारी किंवा काहीही खाण्याचा पदार्थ दिल्यावर ते मला ‘तू घेतलेस का ? घरातील अन्य लोकांना दिलेस का ?’, असे विचारतात.
४. साधना
ते दिवसभरात ३ – ४ घंटे नामजप करतात.
५. साधकांना साधनेत साहाय्य करणे
माझी व्यष्टी साधना पूर्ण होण्यासाठी ते मला साहाय्य करतात. ‘नामजप पूर्ण झाल्यावरच चहा घेऊ’, असे ते म्हणतात. ‘साधकांना किती साहाय्य करू !’, असा त्यांचा भाव असतो. बाहेरगावच्या आणि मार्ग ठाऊक नसलेल्या साधकांना ते घर, रेल्वेस्थानक किंवा बसस्थानक येथपर्यंत सोडतात.
६. प.पू. गुरुदेवांप्रती भाव
अ. ‘प.पू. गुरुदेवांच्या आश्रमात कु. मयुरी (मुलगी) असल्यामुळे मला काळजी नाही’, असे ते बर्याच वेळा म्हणतात.
आ. आमच्या घरातील प्रत्येक खोलीत प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र आहे. यजमान बर्याच वेळा कान पकडून प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभे राहून क्षमायाचना करतात. ‘मला साधना जमत नाही. मला भावाचे प्रयत्न करता येत नाहीत’, असे ते म्हणतात. त्यांची बर्याच प्रसंगात भावजागृती होते.
इ. एकदा रामनाथी आश्रमात होत असलेल्या यज्ञाच्या वेळी त्यांना यज्ञस्थळी बसण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचा भाव जागृत होत होता.
७. जाणवलेला पालट
पूर्वी त्यांचा स्वभाव पुष्कळ कडक होता. आता त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे. ‘माझ्या अयोग्य वागण्यामुळे सर्व दूर गेले का ?’, असे ते म्हणतात. त्यांना त्याची खंत वाटते. ‘आता मी कुणाला दुखावणार नाही’, असे ते म्हणतात.’
– सौ. मंदाकिनी डगवार (पत्नी), वर्धा (२५.१.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |