सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण
‘लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होणार ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सोलापूर – राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. कर्मचार्यांच्या या कामगिरीची ‘लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
ही कामगिरी करणार्या कर्मचार्यांसह राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना प्रबंधक, अधिकारी, ठेकेदार आस्थापनाचे सर्व प्रतिनिधी आणि परियोजना अधिकारी यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले आहे. ‘सद्यस्थितीत सोलापूर-विजापूर राज्यमार्गाच्या ११० किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून हे काम ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल’, असे गडकरी यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे.