प्राचीन वैदिक ज्ञानाला अव्हेरून पाश्चात्त्य विज्ञानाच्या मागे धावणारे भारतीय !
कोलकातामध्ये १०० व्या विज्ञान काँग्रेस समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या शास्त्रज्ञांना विज्ञानक्षेत्रात नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एवढ्या वर्षांनंतरही आम्ही आतापर्यंत तंत्रज्ञानाच्या संदर्भात केवळ पाश्चात्त्यांचे अनुकरण करत राहिलो. खरे तर असे व्हायला पाहिजे होते की, आपल्या देशात आपली संस्कृती, ऋषि, ज्ञान आणि देश अन् देशवासीय यांच्या मौलिक आणि मूलभूत आवश्यकतांकडे लक्ष देऊन संशोधनाची महत्त्वपूर्ण इमारत विकसित व्हायला हवी होती.
(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योति’, जुलै २०१४)