पोहरादेवी (वाशिम) येथे महंतांसह १९ जणांना कोरोनाची लागण
पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या गर्दीचे प्रकरण
पोहरादेवी (वाशिम), २५ फेब्रुवारी – येथील वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ सहस्रो लोकांची गर्दी जमली होती. त्यात असणारे महंत कबिरदास महाराज यांच्या कुटुंबियांसह १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आता निदर्शनास आले आहे.