कोल्हापूर येथे २७ फेब्रुवारी या दिवशी अखंड श्रीराम नामजपाचे आयोजन !
कोल्हापूर – सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काकड आरती, उपहार, प्रसाद आणि सायंकाळी उपासना होणार आहे. तरी या शिबिरासाठी ३४/ए प्रभाग, शारदेंदु, शिवाजी पेठ, रंकाळा तलावाच्या जवळ, मरगाई गल्ली येथे जिज्ञासू, भाविक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अधिवक्ता प्रशांत पाटील यांनी केले आहे.