खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार ! – गृहमंत्री

खासदार मोहन डेलकर आणि गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. डेलकर यांनी आत्महत्या केल्याच्या ठिकाणी १६ पानांचे पत्र सापडले आहे.

या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अनिल देशमुख यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ‘स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात होता’, अशी तक्रार डेलकर यांनी यापूर्वी केली होती, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या वेळी सांगितले.

अनिल देशमुख यांनी सांगितले की, डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांची नावे आत्महत्या पत्रामध्ये लिहिली आहेत. भाजपचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का ? या सर्व त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का ? याची पडताळणी केली जाईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.