मराठीचा प्रचार आणि प्रसार करणार्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव
मुंबई – आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाजमाध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यामध्ये विकीपीडियाच्या माध्यमातून मराठी भाषेतून आरोग्यविषयीची माहिती प्रसारित केली आहे. यांसह विविध चित्रफीती सिद्ध करून समाजमाध्यमांद्वारे प्रदर्शित केल्या आहे. हे करतांना मराठी चित्रपटातील लोकप्रिय संवाद स्वत: बोलून त्याच्या संक्षिप्त चित्रफीती सिद्ध करण्यात आल्या आहेत. याच कार्यासाठी मुंबईतील अमेरिकन राजदूत जे. रँझ, प्रवक्ते नीक नोव्हाक, वरिष्ठ अधिकारी रोना राठोड यांचा देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.