गुंड गजा मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर पोलिसांची धाड
पुणे – कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे आणि त्याचे साथीदार अद्याप पसार आहेत. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथके नेमली आहेत. पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी मुळशीतील फार्म हाऊसवर अचानक धाड टाकली; परंतु पोलिसांच्या हाती ठोस असे लागले नाही. आरोपींना लपण्यास साहाय्य करणार्यांवरही कठोर कारवाई करण्याची चेतावणी पोलिसांनी दिली आहे.