यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा संचारबंदी लागू करू ! – संजय राठोड, पालकमंत्री

यवतमाळ, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी कोविडच्या संदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाची लक्षणे असणार्‍यांनी चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा प्रशासनाला जिल्ह्यात संचारबंदी करण्याविना पर्याय नाही, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाच्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत दिली. ‘३ दिवस परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवले जाईल, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून किमान १० दिवस संचारबंदी घोषित केली जाईल’, असेही ते म्हणाले.