हिंदु अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्या धर्मांधाला अटक
हिंदूंनो, धर्मांधांच्या तावडीत जाण्यापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना वेळीच धर्मशिक्षण द्या !
नवी मुंबई – गुडगाव (हरियाणा) येथील एका धर्मांधाने ‘फ्री फायर’ नावाच्या ऑनलाईन व्हिडिओ गेमच्या माध्यमातून एका हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत मैत्री केली. तिला विवाहाचे आमीष दाखवून रबाळे (नवी मुंबई) येथून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ताबीज तुफेल खान (वय १९ वर्षे) याला गुडगावच्या सरोली गाव (हरियाणा) येथून अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी ताबीज खान याच्यावर बलात्कार, अपहरण, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
रबाळे येथून १ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १७ वर्षीय मुलगी कुणाला काही न सांगता घरातून पळून गेली, अशी तक्रार पालकांनी दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंद करून अन्वेषण करण्यात आले. तिचा घरातील भ्रमणभाष कह्यात घेऊन तांत्रिक पडताळणी केल्यावर ती एका धर्मांधाच्या संपर्कात असल्याचे लक्षात आले. त्यानेच तिचे अपहरण केले असल्याचे निश्चित झाले. सतत रहाण्याची ठिकाणे पालटणार्या आरोपीच्या भ्रमणभाषचा तांत्रिक तपास करून गुडगावच्या सरोली गावातून त्याला अटक करून पोलिसांच्या पथकाने मुलीची सुटका केली.
आरोपी ताबीज खान याची अधिक चौकशी केल्यावर त्याने मुलीला फसवले असल्याचे मान्य करून तिच्यावर ४ वेळा बलात्कार केल्याचेही सांगितले.
लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचा आरोपआंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे कोकण प्रांतचे सहमंत्री उद्धव खराडे यांनी ही घटना घडल्यावर पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. यामध्ये त्यांनी ‘हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे’, असा आरोप करत ‘लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी’, अशी मागणी केली होती. |