‘व्हिप’ डावलणार्या ७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार ! – दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजप
सांगली, मिरज आणि कुपवाड महापौर निवडणूक
सांगली, २४ फेब्रुवारी – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता. हा ‘व्हिप’ डावलून भाजपचे ४ सदस्य आणि १ सहयोगी सदस्य यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास मतदान केले, तर २ सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे या ७ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी दिली आहे.