जालना येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंगारकीच्या दिवशी श्री राजुरेश्वर गणेश मंदिर बंद !
जालना – महाराष्ट्र्राचे आराध्यदैवत म्हणून भोकरदन तालुक्यातील राजूर येथील श्री राजुरेश्वर गणेश मंदिर सर्वदूर परिचित आहे. प्रती मासाच्या चतुर्थीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येत्या २ मार्च या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राजुरेश्वर गणपति संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार १५ फेब्रुवारी ते १६ मार्चपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार अंगारकी चतुर्थीनिमित्त १ मार्च या दिवशी सायंकाळी ते २ मार्च या रात्री उशिरापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.