एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !
लातूर – शहरातील एम्.आय.डी.सी. परिसरातील एका वसतीगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अन्य ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. २२ फेब्रुवारी या दिवशी येथे ६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.