विदर्भासाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा, आवश्यकता भासल्यास मुंबईतून पुरवठा करणार ! – अन्न आणि औषध प्रशासन
मुंबई – कोरोना रुग्णांतील गंभीर रुग्णांचा आकडा अल्प झाल्याने राज्यातील ऑक्सिजनची वाढलेली मागणी मागील ३ मासांत पुष्कळच अल्प झाली होती; मात्र या आठवड्यात विदर्भातील ऑक्सिजनच्या मागणीत काहीशी वाढ झाली असून पुढील १५ दिवसांत मागणी वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. नागपूर येथे मुंबईतील एका आघाडीच्या आस्थापनाचा प्लांट आहे. यामध्ये ८० टन ऑक्सिजन दिवसाला सिद्ध होतो. त्यामुळे तेथेे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. सध्या १ सहस्र २०० टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. तेव्हा आवश्यकता भासल्यास मुंबई आणि रायगड येथून ऑक्सिजन विदर्भातील कानाकोपर्यात पोचवू, असा दावा अन्न आणि औषध प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्याने केला आहे.
नव्या ‘स्ट्रेन’च्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस रुग्णांचा आकडा वाढत रहाण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी आणखी वाढू शकते.