कोरोनामुळे मुंबईतील ८७६ इमारती सील; प्रतिदिन सरासरी ६४४ रुग्ण
मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून दिवसाला सरासरी कोरोनाचे ६४४ रुग्ण आढळत आहेत. ८ फेब्रुवारी या दिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५७४ दिवस इतका होता, तो आता २१ फेब्रुवारीपर्यंत ३२१ दिवसापर्यंत घसरला आहे. मुंबईत बरे होणार्या रुग्णांचा दर ९४ टक्के इतका आहे. मुंबईमध्ये १ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेस्थानकांवर विनामास्क फिरणार्यांवर कारवाई केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईतील ८७६ इमारती सील करण्यात आल्या आहेत.