पोहरादेवी येथील गर्दीच्या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करा ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
मुंबई – मुख्यमंत्री एकीकडे ‘मास्क घाला’, असे आवाहन करतात. दुसरीकडे मात्र शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत, हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.