प.पू. गुरुदेवांना स्थुलातून नव्हे, सूक्ष्मातून अनुभवा !
‘भगवंताला भेटावे’, असे कुणाला नाही वाटणार ? त्याप्रमाणेच ‘आपल्या प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटावे’, असे कुणाला नाही वाटणार ? ‘प्रत्येकच साधकाला प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटावे, त्यांच्याशी बोलावे, त्यांना पहावे, त्यांचे दर्शन घ्यावे’, असेे वाटणे साहजिकच आहे. आपण त्यांच्या प्रीतीमुळेच तर साधनेत आहोत ना ! त्यांनी त्यांच्या प्रेमपूर्वक धाग्याने आपल्याला फुलाप्रमाणे गुंफून त्यांच्या हृदयाशी ठेवले आहे ना !; पण त्यांची प्रकृती बरी नसते. त्यामुळे आपल्याला त्यांना भेटायला मर्यादा येते. आपल्या मनात त्यांना भेटण्यासाठी रूखरूख लागलेली असते. आपल्या प्रिय गुरुमाऊलींनी साधकांना वाटणारी ही खंत आधीच जाणली आहे. त्यामुळेच त्यांनी आधीच लिहून ठेवले आहे,
‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा…. ।’
यातून ‘प.पू. गुरुदेवांना आपल्याला त्यांच्या स्थूल रूपात अडकू द्यायचे नाही’, हे लक्षात येते. स्थुलातून प्रत्यक्ष भेटत असल्याची अनुभूती आपण ‘सूक्ष्मातून भेटून कशी घेऊ शकतो ?’, हे आपल्याला पुढील कवितेतून शिकता येते.
एकदा एका साधकाला ‘प.पू. डॉक्टरांना स्थुलातून भेटावे’, असे तीव्रतेने वाटत होते. ते म्हणत होते, ‘‘मला गुरुदेवांकडे जायचे आहे. त्यांना भेटायचे आहे. ते मला कधीच भेटत नाही.’’ तेव्हा कु. पूनमताईला क्षणाचाही विलंब न करता उत्स्फूर्तपणे पुढील कविता सुचली. यातून तिचा प.पू. गुरुदेवांप्रती असलेला उच्च कोटीचा भाव लक्षात येतो. पुर्वी तिनेसाध खरेतर श्री गुरूंचा सर्वांत अधिक सहवास अनुभवला आहे, तरीही ती कधीच त्यांच्या स्थूल रूपात अडकली नाही. ती सर्वत्र श्री गुरूंना पहाते. त्यामुळे ‘ती अन्य साधकांनाही सहजतेने तसे पहायला शिकवते’, असे लक्षात आले.’
– कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
प.पू. गुरुदेव चराचरात व्यापले आहेत ।
न भेटायला
ते कुठे एक आहेत ।
ते तर चराचरात
व्यापले आहेत ॥ १ ॥
जिकडे दृष्टी फिरवाल ।
तिकडे ते आहेत ॥ २ ॥
तुमच्यात, माझ्यात ।
आपल्या प्रत्येकात
ते आहेत ॥ ३ ॥
केवळ सजीवच नाही, ।
तर निर्जीव गोष्टींमध्येही ते आहेत ॥ ४ ॥
प्रत्येकाला त्या भावानेच भेटा ।
म्हणजे त्या भावातच ते आहेत ॥ ५ ॥
त्यांची आठवण काढता ना ।
त्या आठवणीतच ते आहेत ॥ ६ ॥
त्यांच्या दर्शनासाठी
व्याकूळ होता ना ।
त्या व्याकुळतेतच ते आहेत ॥ ७ ॥
म्हणूनच म्हटले..
न भेटायला ते कुठे एक आहेत ।
ते तर चराचरात व्यापले आहेत ॥ ८ ॥
– कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२१)
|