अॅक्युप्रेशर या चिकित्सा पद्धतीवर कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी बी न्यूजवर संवाद-प्रतिवाद चर्चासत्रात सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे यांचा सहभाग !
कोल्हापूर, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – अॅक्युप्रेशर या चिकित्सा पद्धतीवर कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी बी न्यूजवर संवाद-प्रतिवाद या चर्चासत्रात सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे सहभागी झाले होते. ही माहिती देतांना डॉ. लंबे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा मूलाधार ग्रंथ सनातनचे प्रकाशन १. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन २. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार ३. हातापायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन या ग्रंथांतील माहितीचा उपयोग करून ती सांगितली. या चर्चासत्राचे बी न्यूजया वृत्तवाहिनीवर २४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता याचे पुन:प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे चर्चासत्र https://www.youtube.com/watch?v=zA5Mva1sx0E&feature=youtu.be या लिंकवर पहाण्यासाठी उपलब्ध आहे.