हरिद्वार कुंभमेळ्याची मानक संचालन प्रक्रिया रहित करण्यासाठी धरणे आंदोलन
हरिद्वार (उत्तराखंड) – येथे कुंभच्या मानक संचालन प्रक्रियेच्या (एस्.ओ.पी.च्या) विरोधात व्यापार्यांनी सुभाषघाटावर अनिश्चितकालीन धरणे प्रारंभ केले आहे. व्यापार्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल आणि नोंदणी अनिवार्य केल्याने त्यांनी कुंभनगरीमध्ये जाण्यास नकार दिला आहे. व्यापार्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत एस्.ओ.पी. रहित करत नाही, तोपर्यंत धरणे चालू राहील.
राज्याच्या व्यापार मंडळाचे अध्यक्ष संजीव चौधरी यांनी म्हटले की, एस्.ओ.पी.च्या कठोर नियमांमुळे व्यापारी वर्ग कुंभमध्ये स्नानासाठी कसा येईल ? जर भाविकही आले नाही, तर व्यापार्यांची हानी हेणार आहे. लोकांची श्रद्धा आणि व्यापारी दोन्हींचे रक्षण होण्यासाठी भव्य कुंभचे आयोजन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.