पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते ‘युवा गंधर्व’ पुरस्काराचे वितरण
सोलापूर – सुंद्रीकला अकादमीच्या वतीने येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनी अट्टम आदी विविध संगीतांच्या कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या प्रतिभा महोत्सवाचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध कलाकारांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ‘युवा गंधर्व’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या वेळी संयोजक भिमण्णा जाधव महापालिका उपायुक्त धनराज पांडे, नंदिनी शिंदे, कथ्थक नृत्य कलाकार मयुर वैद्य आदी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा संगीत महोत्सव पार पडला. दोन दिवसीय संगीत महोत्सवाचा समारोप २१ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आला.
पुरस्कार प्राप्तकर्ते
या वेळी बासरीवादक निनाद मुळगावकर, कोलकाता येथील सतारवादक कल्याण मुजमदार, देहली येथील प्रसिद्ध नृत्य कलाकार मलाविका अजितकुमार, मुंबईच्या पूजा मोरे आणि सई कानडे, बेळगावचे हार्मोनियम वादक सारंग कुलकर्णी, बेंगळूरू येथील भरतनाट्यम् कलाकार अंजना शर्मा, पुणे येथील वैष्णवी सुंदरम्, सोनवी मेहेंदळे, सानिका जोशी.