मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांच्या सोलापुरातील घरावर प्राप्तीकर विभागाची धाड
साडेसात कोटी रुपये रक्कम जप्त
सोलापूर – काँग्रेसचे मध्यप्रदेशातील आमदार नीलय डागा यांच्या सोलापुरातील घरावर प्राप्तीकर विभागाचे उपसंचालक आणि त्यांच्या पथकाने धाड घातली आहे. या वेळी त्यांच्या घरातून साडेसात कोटी रुपये रक्कम जप्त करण्यात आली. आमदार नीलय डागा यांचे सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एम्.आय.डी.सी. येथेही खाद्यतेल आस्थापन आहे. धाडीमध्ये प्राप्त झालेली रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या यंत्राचा वापर करावा लागला. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांची देशभरात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह अन्य राज्यांमध्ये अनुमाने २० खाद्यतेल आस्थापने आहेत. करभरणा टाळण्यासाठी त्यांनी रोखीने व्यवहार केल्याविषयी त्यांच्या आस्थापनांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली आहे. (नियमांना बगल देत व्यवहार करणारे आमदार असणारी काँग्रेस जनतेला कायद्याचे राज्य कधी देऊ शकेल का ? – संपादक)