बनावट ‘फेसबूक पेज’वर कर्जाचे विज्ञापन देऊन महिलेची फसवणूक !
पुणे – आरोपीने ‘फेसबूक’वर बनावट पेज सिद्ध करून त्यावर कर्ज देण्याचे विज्ञापन देऊन दिपाली मकरंद होडे या महिलेशी संपर्क केला. कर्जासाठी ‘स्टॅम्प ड्युटी’ म्हणून २० सहस्र रुपये घेऊन कर्ज न देता त्या महिलेची फसवणूक केली. हा प्रकार ३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सोमाटणे येथे घडला आहे. होडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.