मुंबईतील हॉटेलमध्ये खासदार मोहनभाई देलकर यांचा मृतदेह आढळला !
मुंबई – दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहनभाई देलकर (वय ५१ वर्षे) यांचा मृतदेह मरीन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ या हॉटेलमध्ये आढळला आहे. या प्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांनी गुजराथी भाषेत लिहिलेली चिठ्ठी येथे आढळली आहे. यात मोठ्या लोकांची नावे आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते पूर्वी भारतीय नवशक्ती पार्टी आणि काँग्रेस या पक्षांत होते.