अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा विरोध नेहमीच करू ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
भंडारा – पडद्यावर हिरो असलेले अभिनेते खर्या आयुष्यात कसे झिरो आहेत, हे दाखवण्यासाठी आम्ही अभिनेते अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांचा लोकशाही पद्धतीने नेहमीच विरोध करू. या दोघांचे चित्रीकरण आणि चित्रपट जिथे कुठे चालू असतील, तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून विरोध करतील. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावरून कोणतेही घुमजाव केलेले नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, भाजपचे नेते गिरीश महाजन हे छोटे नेते असल्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. राठोड यांच्याविरुद्ध सध्या ‘मीडिया ट्रायल’ चालू असून वास्तव पुढे आल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका मांडेल. शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शासनाने हुकूमशाही पद्धत दाखवली, ती खर्या अर्थाने मोगलाई आहे.