केरळ सरकार ‘लव्ह जिहाद’कडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ! – योगी आदित्यनाथ
हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
कासारगोड (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने वर्ष २००९ मध्ये लव्ह जिहादच्या संदर्भात टिप्पणी करतांना ‘लव्ह जिहाद’मुळे केरळ इस्लामी राज्य होईल’ असे म्हटले होते; मात्र केरळ सरकारने लव्ह जिहाद रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. केरळ सरकारने त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी ‘विजय यात्रे’चे उद्घाटन योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
Yogi Adityanath accuses Kerala govt of taking no action to curb ‘love jihad’
Read @ANI Story | https://t.co/4iq5wRXfSg pic.twitter.com/zeOcWTxrpo
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2021
केरळमधील १४ जिल्हे आणि मोठ्या विधानसभा मतदारसंघात ‘विजय यात्रा’ काढली जाणार आहे.
(सौजन्य : India Today)
या यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत प्रचाराच्या दृष्टीने याकडे पाहिले जात आहे.