२५ फेब्रुवारी या दिवशी होणारा सकल ओबीसी मेळावा स्थगित ! – अरुण खरमाटे
सांगली, २२ फेब्रुवारी – सकल ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी सांगलीत होणारा महामेळावा राज्यात कोरोना रुग्ण संख्येत होणार्या वाढीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन आणि मेळाव्याचे प्रमुख मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मेळावा स्थगित करण्याची विनंती केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाल्यावर काही दिवसांतच मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मेळाव्याचे मुख्य संयोजक अरुण खरमाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बाळासाहेब गुरव, शशिकांत गायकवाड, दीपक सुतार, कैलास स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.