क्रांतीकारक वासुदेव बळंवत फडके पुरस्कार ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला प्रदान !
सांगली – सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी क्रांतीकारक वासुदेव बळंवत फडके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देण्यात येणारा पुरस्कार यंदा १७ फेब्रुवारी या दिवशी ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला प्रदान करण्यात आला. दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक श्री. चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते श्री ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, रोख १५ सहस्र रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नगर वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्काराचे प्रायोजक शरद फडके यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुहास करंदीकर, अविनाश टिळक, मोहन गोसावी यांसह अन्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. शुभदा पाटणकर यांनी केले.