वृद्ध, अपंग आणि रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २ ई-रिक्शा भेट !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे दर्शनाला येणार्या भाविकांच्या सोयीसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाऊंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने गिअर बॉक्स असलेल्या बॅटरीवर धावणार्या २ ई-रिक्शा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याचा सोहळा २१ फेब्रुवारीला ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला. श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वृद्ध, अपंग आणि रुग्ण भाविकांना मंदिराकडे चालत जावे लागते. त्यांच्यासोयीसाठी या रिक्शांचा वापर करण्यात येणार आहे. ‘मंदिर समितीला भेट देण्यात आलेल्या दोन्ही रिक्शांच्या देखभाल दुरुस्तीचे दायित्वही आम्ही घेतले आहे’, असे अधिवक्त्या माधवी निगडे यांनी सांगितले.