नोटांवर नेताजी बोस यांचे छायाचित्र छापण्यास केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली !
नेताजी सुभाषचंद्रच नव्हे, तर देशातील असंख्य क्रांतीकारकांनी देशासाठी प्राणांचे बलीदान दिले आहे. हे पहाता केवळ ‘एका’च नेत्याचे छायाचित्र नोटांवर का ?, असा प्रश्न नेहमीच भारतियांच्या मनात येतो !
चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र छापण्यासाठी केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकाचा आदेश दिला जाऊ शकत नाही; मात्र कोणताही महान नेता आणि व्यक्ती यांनी दिलेल्या बलीदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही स्पष्ट केले.
Plea Seeking Printing Of Nethaji Subash Chandra Bose’s Picture On Indian Currency Notes- “Consider The Request”: Madras HC To UOI https://t.co/SfHadbu4zc
— Live Law (@LiveLawIndia) February 21, 2021
त्याच वेळी सरकारलाही यावर विचार करण्यास सांगितले. ही याचिका के.के. रमेश यांनी प्रविष्ट केली होती.