सनातनचा रामनाथी, गोवा येथील आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
सर्व व्यक्तींना अध्यात्मात प्रगती करण्यासाठी ‘सनातनचा रामनाथी आश्रम’ ही उत्तम चैतन्यमय वास्तू !
‘सनातन आश्रमाची पूर्ण वास्तू चैतन्यमय आहे’, असे मला वाटले. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील लादीमध्ये वाढत असलेल्या आपतत्त्वामुळे झालेले पालट पाहून माझ्या मनात चैतन्ययुक्त आनंद निर्माण झाला. स्वागतकक्षातील भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा ही अतिशय चैतन्यमय, उत्कट भाव असणारी आहे. ध्यानमंदिर अतिशय चैतन्यमय असून ग्रंथ आणि दैनिक, तसेच पाक्षिक सनातन प्रभात आदींचे कामकाज स्वयंस्फूर्त रितीने होत आहे. सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पाहून माझ्या मनात एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली. साधनेला आरंभ करून अध्यात्मात प्रगती करण्याची इच्छा असलेल्या सर्व व्यक्तींसाठी सनातनचा रामनाथी आश्रम ही उत्तम चैतन्यमय वास्तू आहे.’
– डॉ. उमेश धर्मा राठोड, घाटकोपर, मुंबई. (२८.१.२०१८)
धर्माभिमानी सनातनच्या आश्रमातील चैतन्याची अनुभूती घेतात, तर राष्ट्र आणि धर्म द्रोही आश्रमासमोरून शिव्या देत जातात आणि आश्रमावर दगडफेक करतात !
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |