एका साधिकेला एका राज्यातील एका रुग्णालयात आलेला वाईट अनुभव
१. एका सरकारी रुग्णालयात गेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी रुग्णाची तपासणी न करताच त्याला गंभीर आजार झाल्यासारखी वागणूक देणे
‘ताप, सर्दी आणि खोकला असल्यामुळे २३.३.२०२० या दिवशी मी माझ्या भावाला एका राज्यातील एका सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्या वेळी तेथील एका आधुनिक वैद्यांनी त्याची कागदपत्रे पाहिली आणि त्याला कोरोनाग्रस्त ठरवूनच त्या माझ्याशी बोलू लागल्या. रुग्णाची तपासणी करण्यासही त्या सिद्ध नव्हत्या. त्यांनी आम्हाला लगेच दुसर्या मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘इथे त्याला ठेवल्यास इतरांना त्याचा संसर्ग होईल. त्याचा वयोगटही कोरोनाबाधित वयोगटात येतो.’’ त्या आधुनिक वैद्या बोलतांना माझ्याकडे पहातही नव्हत्या. ‘मी रुग्णाच्या संपर्कात आले आहे’, या विचाराने त्या मलाही टाळत होत्या. त्यांना मी ‘येथून मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी आपण सांगत आहात, असे आपण लिखित स्वरूपात द्या’, असे सांगितल्यावरही त्यांनी तसे लिहून दिले नाही. ‘‘त्यांना तोंडीच सांगा’’, असे त्या आधुनिक वैद्या म्हणाल्या. त्या वेळी त्यांच्या या वागण्यामुळे मला थोडा ताण आला.
२. दुसर्या मोठ्या सरकारी रुग्णालयात तपासणी केल्यावर रुग्णाईत भावाला केवळ ‘शीतज्वर’ (फ्ल्यू) झाल्याचे आणि काळजी करण्याचे कारण नसल्याचे तेथील आधुनिक वैद्यांनी सांगणे
आम्ही परिचित वैद्यांशी बोलून दुसर्या मोठ्या रुग्णालयात गेलो. तेथील आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्हाला एवढ्या लांब ४५ मिनिटे अंतरावर असलेल्या या रुग्णालयात कशाला पाठवले ? तिकडेच त्या वैद्यांनी तपासले का नाही ? त्यांनी तुम्हाला इकडे अनावश्यक पाठवले.’’ असे म्हणत ते चिडचिड व्यक्त करू लागले. मी त्यांना ‘‘आता आपण तरी याला तपासून ‘काय झाले आहे ?’ ते सांगा’, असे म्हटल्यावर त्यांनी पुढील प्रक्रिया चालू केली. रुग्णाच्या रक्त तपासणीच्या अहवालात सर्व ठिक असून त्याला केवळ साधा ‘शीतज्वर’ (‘फ्ल्यू’) झाला असल्याचे निदान आधुनिक वैद्यांनी केले. त्यासाठी त्यांनी त्यावरची (जुजबी) औषधे दिली. त्यांनी ‘‘काळजी करण्याची आवश्यकता नाही’’, असेही सांगितले.
३. आधुनिक वैद्यांचे रुग्णाशी दायित्वशून्यपणाचे वागणे, म्हणजे संवेदनशील रुग्णाच्या जिवाशी खेळण्यासारखेच असणे
या प्रसंगात आधीच्या आधुनिक वैद्यांनी रुग्णाला न तपासताच ‘कोरोना’ग्रस्त ठरवले होते. ‘या आधुनिक वैद्यांच्या अशा वागण्यामुळे एखादा रुग्ण संवेदनशील असेल, तर त्याची आणि त्याच्या नातेवाईकाची काय अवस्था होऊ शकेल’, याची साधी कल्पनाही त्या आधुनिक वैद्यांना नव्हती. ‘अशा प्रकारे अंदाजे निदान करणे, म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे’, असे मला वाटले.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२०)
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’स साहाय्य करा !१. राष्ट्रप्रेमी नागरिकांनो, वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी संघटित व्हा !वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी ‘आरोग्य साहाय्य समिती’स त्वरित कळवा. २. चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !पैसे लुबाडणार्या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना आहे. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. ३. आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्तासौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१ संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |